७९ स्वातंत्र्य दिन साजरा
होरायझन अकॅडमी स्कूलमध्ये ७९ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरा.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
तसेच मविप्र येवला तालुका संचालक नंदकुमार बनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पालक शिक्षक संघाचे प्रवीण गायकवाड व पालक उपस्थित होते.
याप्रसंगी प्री प्रायमरीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, भाषण, नाट्य कौतुकास्पद होते.
आठवीच्या विद्यार्थ्यांनी पहलगाम हल्ल्यावर सादर केलेल्या नाटिकेमुळे उपस्थितांच्या अंगावर शहारे उभे राहिले. तसेच देशभक्तीपर अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले.
आरोही शिंदे व ईश्वरी शिनगर यांनी सूत्रसंचालन केले.
संचालक नंदकुमार बनकर व पालक दिगंबर पठारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
दिपाली भांगे यांनी आभार मानले. स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.